Belgium Holland Boat & Bike

Post Image
MAY 2018

Belgium Holland Boat & Bike

“Had been to cycle tour to Europe” ...एका मैत्रिणीने सांगितलं ....मी तीन ताड उडाले ! .. सायकल चालवण्यासाठी कुणीयुरोप ला जातं ? झेपलंच नाही ... आणि त्यात म्हणे रोज average५० km सायकल चालवायची!!! “Definitely not my cup of tea !!” मनाने आधीच कबूल केलं ...नेहमीप्रमाणे ही अजब कल्पनानवर्याच्या कानावर घातली आणि त्याने मनावरचं घेतलं ... "तू पण चल, मी एकटा जाणार नाही " असं इमोशनली ब्लॅकमेल केल्यामुळे , अत्यंतसेफ झोन मध्ये कायम वावरणाऱ्या मी …कधी नव्हे तो पुढचा मागचाविचार न करता "ho" म्हणून टाकलं...पैसे भरून झाले, एअर तिकीटबुक झालं... आपण काहीतरी नवीन करतोय या crazy फीलिंग मध्येमी जरा हवेतच होते ....शाळेत असताना साध्या हिरो सायकल वरूनफार तर फार २ km असा मारलेला पल्ला हीच काय ती अनुभवाचीशिदोरी !! आणि यावेळी टार्गेट होतं बेल्जियम पासून Amsterdam पर्यंत ६ दिवसात ३०० kms पूर्ण करण्याचं ...

"मी तुला माझी गियर सायकल शिकवेन " मुलाने पुढाकार घेतला ......"गेले १० वर्ष फोर व्हिलर चालवतेय ..त्यात काय.... " ... हा कॉन्फिडन्स फक्त बिल्डिंग भोवती १ -२ चकरा मारायला पुरेसा ठरला .. पण टूर लीडर बरोबर प्रॅक्टिस sessionla जेव्हा necklace रूट निवडला तेव्हा खाडकन डोळे उघडले ...”चढ आला कि लो गियर ...फ्लॅट terrainwar highest गियर” ... मनात १००० वेळा गिरवलेली थेअरी राहिली कागदावरच... हिरो सायकल सारख्या upright position मध्ये सायकल चालवायची सवय असल्याने आजकालच्या पाठीत बाक काढून चालवायच्या सायकलवर २० km चा पल्ला गाठताना चांगलाच घाम फुटला ... एकूण काय पहिल्याच प्रॅक्टिस नंतर अस्मादिकांचा ओव्हरकॉन्फिडेन्सचा फुगा फुटला…!!!

" कुठे बुद्धी गहाण टाकली होती हो म्हणताना .... पैसे परत नाही कामिळणार ..." अशा विविध विचारांनी डोक्यात गर्दी केली . "Visa काढायचा ना " या नवर्याच्या प्रश्नाने घाम फुटायला लागला ..... पण शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करून परत सायकल काढली आणिसेनापती बापट रोडवर संध्याकाळ्च्या वेळी १० km ची ride एकटीने पूर्ण केली ... गियर सिस्टिम ची थेअरी practically कशी वापरायची हे नीट समजावून घेतले ... “प्रयत्नांती परमेश्वर” हे पुन्हाएकदा पटलं .. त्या दिवशी घरी आल्यावर स्वतःची स्वतःला एकशाबासकीची थाप दिली ... आणि "we should never underestimate ourselves" हा धडा परत एकदा नव्यानेशिकले ...

आणि मग मात्र प्रॅक्टिस सेशन्स चा धडाका लावला ... मिळाला वेळ कर सायकलिंग!!! ... आणि हळू हळू आपण नक्कीच ३०० km चा टार्गेट पूर्ण करणार असा आत्मविश्वास निर्माण झाला ... सायकलिंगaccessories खरेदी केल्यावर तर मनातल्या मनात मी ती ride पणपूर्ण Karun आले !! अखेर जिथून आमची टूर चालू होणार होती त्याBruggs या बेल्जियम मधील शहरात आम्ही पोचलो ... प्रत्येकाचीउंची टूर लीडरने आधीच कळवुन ठेवली होती ... त्या प्रमाणे आमच्यानावाने सायकल तयार होत्या ... भारतामधील आम्ही १२ आणिअमेरिका , कॅनडा , ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क इथून २८ जण असेआम्ही ४० जण या bike ride साठी आलो होतो. आमची राहायचीव्यवस्था बोटीवर होती .. सर्वात वर ओपन deck, मध्ये कॅफेटेरियाआणि बार , आणि सर्वात खालच्या डेकवर ट्वीन रूम्स अशी आमच्याबोटीची रचना होती .. १ कॅप्टन , २ टूर लीडर्स , रोज फ्रेशinnovative डिशेस बनवून खायला घालायला ४ जणांचा चमू आणिआम्ही ४० जण ... पुढचे ६ दिवस नव्याने Europe बघणार होतो !

आमचा रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा ..

सकाळी ८ - ९ - ब्रेकफास्ट

९:१५ – ४:00 \ ५:00 - सायकलिंग ( अर्थात मध्ये मस्तशा कॅफेमध्येकधी कॉफी \ Hot chocolate चा ब्रेक आणि लंच ब्रेक घेऊनच ) ....

६:00 - ८:00 - ३ कोर्स डिनर

८:15 - ८:४५ - दुसऱ्या दिवशीच्या route baddal discussion, weather अपडेट्स

९:०० - ९:४५ - असू त्या शहराचा फेरफटका

आणि आपण आजचं टार्गेट पूर्ण केलं हे celebrate करायला नंतर उशिरापर्यंत पत्त्यांचे डाव कुटणे…

अत्यंत नीट आखलेला सायकल रूट.. त्यासाठी लागणारी नंबरिंग सिस्टिम इतकी अचूक कि कुणी ठरवलं तरी रस्ता चुकणार नाही .... सायकलिस्टना मिळणारे प्राधान्य ... निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेली खेडी ... कधी रिमझिम पाऊस .. तर कधी जोराचा वारा ... अगदी चित्रातली वाटावी त अशी घरं ...प्रत्येक सुंदर घराच्या बाजूला असणारी तितकीच सुबक विविध रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बाग ... ( इथे आमच्या झाडाला २ फुलं आली तरी खुश होणारे आम्ही .. तिथले लोक इतकी फुलं बघून हर्षवायूने वेडे होत असतील का असा विचार आला माझ्या मनात )... स्वच्छ सूर्य प्रकाश पण हवेतला जरासा बोचरा थंडावा .... अत्यंत अदबीने "hello" म्हणणारी माणसं.... स्वतःच्या डोळ्यांनी टिपलेली निसर्गाची असंख्य रूपे …... ( नाहीम्हणायला हळू हळू सायकल चालवत सेल्फी काढायला , शूट करायलाशिकले सुद्धा ..... ) … लांबच लांब पसरलेली हिरवीगार कुरणे , त्यातसंथपणे रवंथ करणाऱ्या गायी , नाजूक रानफुलांच्या पसरलेल्यारांगा.... स्वच्छ नितळ पाण्याचे कालवे ... आणि त्यावर विहार करणारेरंगीबेरंगी पक्षी ...आणि हे कमी कि काय म्हणून अथांग पसरलेलंनिळेशार आभाळ ... ….अशा अत्यंत सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात आम्ही यूरोपमधील टिपिकल खेड्यांमधून आमचा ३०० km चा सायकल प्रवास केला नव्हे अक्षरशः क्षण आणि क्षण जगलो ......

काय दिले नाही या tour ने मला ... एक नवा आत्मविश्वास ... सहलीची एक नवी व्याख्या .... आणि अर्थातच नवीन मित्र मैत्रिणी ...घरच्यांचा पाठिंबा ही तर सर्वात जमेची बाजू !

या आधी पण मी युरोपला जाऊन आले होते ... पण या वेळी सायकलवरून पालथा घातलेला युरोप काही वेगळाच भावला...

का मलाच मी नव्याने शोधले म्हणून तो वेगळा भासला?...

So... Don't even give any second thought... Do contact Green Earth Adventures and start your hatke vacation NOW ......

Post Image